व्यक्तिमत्वावर दृष्टीक्षेप

सुसंस्कृत, सुविद्य, सकारात्मक राजकारणी म्हणून सुपरिचित... माजी आमदार

कृष्णा हेगडे शिवसेना

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातुन २००९ ते २०१३ कालखंडात आमदार म्हणून असलेली कृष्णा हेगडे कारकीर्द ही खर तर प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी आदर्श! खचितच एखादा मतदारसंघ इतक्या प्रचंड सकारात्मक परिवर्तनाचा पाच वर्षांच्या कालावधित लाभ प्राप्त करु शकला असेल. कृष्णा हेगडे यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे नाविन्यपूर्ण संकल्पना आणि शाश्वत विकासकामे.

लोकप्रतिनिधी पद हे साध्य न मानता साधन मानुन जनसेवेसाठी समर्पित भावनेने केवळ पदावर असतानाच नाही तर तत्पुर्वी आणि त:पश्चात देखील अविरत कार्य करणारे कृष्णा हेगडे यांच्यासाठी राजकीय नेतृत्व हे महत्त्वपूर्ण असले तरी नवखे नव्हते, आणि त्यामुळेच ते प्रगल्भतेने त्यांच्या पदास न्याय देऊ शकले, त्यांच्यावर जनतेने दाखविलेल्या विश्वासास सार्थ ठरवु शकले.

समाजकार्याचा आणि राजकारणाचा वारसा

विद्यार्थी दशेपासुनच समाजकारणात सक्रिय सहभाग

कृष्णा हेगडे यांना समाजकार्याचा आणि राजकारणाचा वारसा प्राप्त झाला त्यांच्या वडिलांकडुन. त्यांचे वडिल समाजकार्यात सक्रिय होते, साल 1962 पासुन ते कॉंग्रेस पक्षाशी निगडीत होऊन समाजसेवा अधिक परिणामकारक रित्या राजकारणाच्या माध्यमातुन करु लागले. त्यांच्याच छत्रछायेखाली कृष्णा हेगडे विद्यार्थी दशेपासुनच समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवु लागले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अगदी शालेय जीवनात देखील ते परखड भूमिका मांडु लागले. महाविद्यालयात प्रवेश घेताच अकरावीतच त्यांनी एम. एस. वाय. सी च्या निवडणुक उमेदवार म्हणून लढवली आणि जिंकुन दाखवली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात, तसेच त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, समाजसेवी उपक्रमात झोकुन देऊन काम करणारे कृष्णा हेगडे अभ्यासात देखील चमक दाखवत होते.

त्यांना असलेली तरुणांच्या प्रश्नांची जाण, युवा वर्गावर असलेला त्यांचा प्रभाव, समाजकारण आणि राजकारणाची सुयोग्य सांगड घालण्याचे कौशल्य आणि हाती घेतलेला प्रश्न तडीस नेण्याची वृत्ती जर वरिष्ठ राजकारण्यांच्या नजरेस पडली नसती तरच नवल. याचाच परिपाक म्हणजे युथ कॉंग्रेसमध्ये मुंबई कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरीसारख्या तत्कालिन महत्त्वपूर्ण पदावर त्यांची पक्षाने नियुक्ती केली आणि हेगडे यांनी देखील या जबाबदारीस पूर्ण न्याय दिला. अनेक वर्षे या पदावर त्यांनी उल्लेखनीय कार्य केले, वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत त्यांनी या पदावर काम केले आणि नंतर नवीन युवा नेत्यांना संधी मिळावी या हेतूने स्वत:च या पदाचा राजीनामा दिला.

त्यांचे कार्य आणि प्रतिभा पाहुन कॉंग्रेस पक्षाचे तत्कालिन वरिष्ठ नेते स्वर्गीय सुनिल दत्त साहेबांनी कृष्णा हेगडे यांना त्यांचा प्रवक्ता म्हणून जबाबदारी दिली. पक्ष कार्यामुळे आलेल्या सहवासात कृष्णा हेगडे यांचे दत्त साहेबांसोबत जिव्हाळ्याचे, वडीलकीचे संबंध निर्माण झाले होते, त्यांनी या पदाचा स्विकार केला आणि स्वत:च्या स्वभावानुसार या पदास पुरेपूर न्याय दिला. अशा प्रकारे कॉंग्रेस पक्षात अनेक पदांवर राहुन त्यांनी पक्षाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. 

आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन केलेल्या विकासकामांद्वारे

विलेपार्लेचा कायापालट

पाच वर्षांच्या कालावधीत 'विलेपार्ले' मतदारसंघात रु. 600 करोड निधीची विकासकामे

2009 साली पक्षाने त्यांना विलेपार्ले सारख्या सुशिक्षित मतदारसंघातुन आमदारकीची उमेदवारी दिली आणि त्यांनी ती लिलया पेलली. विलेपार्ले मतदारसंघातील अनेक ऐतिहासिक, आगामी पिढ्यांना उपयुक्त ठरतील अशा विकासकामांचा श्रीगणेशा करण्याचा मान कृष्णा हेगडे यांच्याकडे जातो. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन अनेक कामांची मुहुर्तमेढ देखील रोवण्याचे श्रेय कृष्णा हेगडे यांचेच.

मिलन सबवे, सहार इंटरनॅशनल एअरपोर्ट फ्लाई ओवर, डोमेस्टिक एअरपोर्टवर वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य तस्वीर, भव्य शहीद स्मारक, मुंबई एअरपोर्टवर अत्याधुनिक कंट्रोल टॉवर अशी अनेक विकासकामे कृष्णा हेगडे यांच्या दैदिप्यमान कारकीर्दीची साक्ष देतात. 

टर्मिनल 2 फ्लाय ओव्हर : रु. 451 करोड तर मिलन सबवे : रु. 84 करोड अशी भव्य विकासकामे अन्य अनेक विकासकामांसोबत साकारली, पाच वर्षांच्या कालावधीत ‘विलेपार्ले’ मतदारसंघात रु. 600 करोड निधीची विकासकामे साकारण्याचा विक्रम करणारे कृष्णा हेगडे!

शाश्वत नियोजनबद्ध दूरदर्शी विकासकामे

विलेपार्ले मतदारसंघातील आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन आगामी पिढ्यांना उपयुक्त ठरतील अशा अनेक विकासकामांचा प्रशंसनीय पल्ला

मिलन सबवे

सहार इंटरनॅशनल एअरपोर्ट फ्लाई ओवर

डोमेस्टिक एअरपोर्टवर वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य तस्वीर

सीसीटीव्ही कॅमेरे

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, देशातील हा पहिलाच विधानसभा मतदारसंघ आहे जिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.

मुंबई एअरपोर्टवर अत्याधुनिक कंट्रोल टॉवर

कृष्णा हेगडे यांनी विलेपार्ले क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण आगळ्यावेगळ्या संकल्पनांनी मुंबईत अनुकरणीय पाऊल प्रथम टाकण्याचा मान विलेपार्लेस मिळवुन दिला. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, देशातील हा पहिलाच विधानसभा मतदारसंघ ठरला जिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, नंतर अर्थातच अनेक स्थानी याचे अनुकरण झाले, परंतु मुहुतमेढ रोवण्याचा मान विलेपार्लेचाच. रेल्वे स्थानकावर स्वयंचलित जिने आज आपल्याला सगळीकडे आढळतात परंतु मुंबईत सर्वप्रथम स्वयंचलित जिने रेल्वेस्थानकावर बसवले ते विलेपार्ले विधानसभ मतदारसंघाने, श्री. कृष्णा हेगडे यांच्या दूरदृष्टीमुळे, त्यांच्याच आमदारनिधी द्वारे! तब्बल 11 उद्याने आणि 52 रस्ते कृष्णा हेगडे यांनी उभारुन विलेपार्लेचा कायापालट करून दाखवला. पाकिस्तानच्या कैदेत सापडलेल्या भावेश परमारला सोडवुन मायदेशी परत आणण्याचे अशक्यप्राय वाटणारे शिवधनुष्य देखील त्यांनी पेलुन दाखवले.
दुर्दैवाने नंतर आलेल्या निवडणूकीत सामुहिक संमोहनावस्थेत असल्याप्रमाणे मतदान करणार्‍या लाटेत कृष्णा हेगडे यांना त्यांच्या कार्याची पावती मतदानपेटीतुन मिळताना हुकली. परंतु, कृष्णा हेगडे यांनी जनसेवेचा वसा काही सोडला नाही. ते अविरतपणे समाजसेवा करित राहिले.
कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी कॉंग्रेसला राम राम करुन भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु तिथे देखील त्यांचे मन रमले नाही. राजकारणापेक्षा समाजकारणास महत्त्व देणार्‍या शिवसेनेत फेब्रुवारी 2021 मध्ये माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी प्रवेश केला. परंतु शिवसेनेत उभी फुट पडली आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वा माननारी मुळ शिवसेना, जवळपास समस्त लोकप्रतिनिधी विद्यमान मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ‘शिवसेना’ पक्षाच्या माध्यमातुन समाजसेवेचा वसा पूढे चालवु लागली. शिवसेनेत उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हवा तितका समाजसेवेस वाव मिळत नसल्यामुळे घुसमट होणारे कृष्णा हेगडे श्री. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेना’ पक्षात सामिल झाले.
आता ते पूर्ण वेळ शिवसेनेचा 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सूत्रानुसार समाजसेवेत रत आहेत. लोकप्रतिनिधीपेक्षा आज विलेपार्ले येथील जनतेला लोकांना प्राधान्य देणारा नेता अधिक जवळचा वाटतो, आणि हेच यश आहे कृष्णा हेगडे नामक एका समर्पित राजकारणातुन समाजाची सेवा करणार्‍या समाजसेवकाचे!

संपर्क माहिती

दूरध्वनी : ९१ ९८२१३७२७७७ / ०२२-२६१११७७७

ई-मेल : hegdkrishna@gmail.com

पत्ता : मा. आमदार कृष्णा हेगडे 
जनसंपर्क कार्यालय,
व्ही. एस. खांडेकर मार्ग,
विलेपार्ले स्थानका जवळ,
विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७.

८०% समाजकारण २०% राजकारण 

सेवा, सुरक्षा आणि विकास हेच आमचे प्रमुख धोरण

Copyright © Krishna Hegde. All Rights Reserved.