कृष्णा हेगडे, माजी आमदार; 'शिवसेना' पक्ष उपनेते-प्रवक्ते
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
८० % समाजकारण आणि २० % राजकारण ।। 'शिवसेना' पक्षाचा वसा ।।
असली हिंदुत्वाचा वारसा, एकमेव वंदनीय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा…
'शिवसेना' पक्ष हिंदुत्वाचा लढा लढतोय, असली हिंदुत्वाचा प्रचार करतो आणि हिंदुत्वाचे रक्षण करतोय.
केवळ ‘शिक्षणाचा हक्क’ हे उद्दीष्ट नसुन सर्वांना ‘दर्जेदार’ शिक्षणाचा हक्क…
'शिवसेना' पक्षाचे उद्दीष्ट केवळ सर्वांना शिक्षणाचा हक्क देणे हे नसुन सर्वांना दर्जेदार शिक्षण देणे हे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा संपूर्ण देशाला आदर्श वाटेल इतका उंचावण्यासाठी 'शिवसेना' कटीबद्ध आहे.
विकास केवळ कागदावर नसावा तर तो प्रत्यक्षात उतरवावा आणि शाश्वत असावा…
'शिवसेना' पक्षाचे उद्दीष्ट विकासाच्या योजना कागदोपत्री मांडण्यापेक्षा त्या खर्या अर्थाने नागरिकांना उपयुक्त ठरतील या स्तरावर जाऊन प्रत्यक्षात आणाव्यात आणि महत्त्वाचे म्हणजे तो अल्पजीवी ठरू नये तर शाश्वत म्हणजेच कायमस्वरुपी असावा, सर्वसमावेशक आणि सर्वांगिण विचार करुन मांडलेला असावा....
पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण केवळ घोषणारुपी न राहता त्यांची अंमलबजावणी व्हावी
जोपर्यंत समाजातील प्रत्येक घटक पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण ही स्वत:ची केवळ जबाबदारी न मानता कर्तव्य समजुन स्वत:ची भूमिका पार पाडत नाही तोवर खर्या अर्थाने पर्यावरण संवर्धन शक्य नाही. पंचमहाभूते मानवजातीच्या रक्षणासाठी लाभलेले वरदान आहे, सायकल वापर, प्लॅस्टिकबंदी पासुन वृक्षारोपण, मॅन्ग्रोव्ह्ज इ. सर्व पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठीचे विविध मार्ग आहेत, या बद्दल उपक्रम राबविताना जनप्रबोधन हा यातील मोठा घटक आहे.
उद्योग जगला तर कामगार जगेल… – वंदनीय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे
वंदनीय बाळासाहेबांनी कामगारांना हक्कांसाठी लढण्याचा आणि त्याच समयी आस्थापनाच्या देखील हितास साधण्याच्या दिलेल्या मंत्रानुसार कामगारांचक़ सर्वतोपरी विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.
बेरोजगारीच्या समस्येवर जर वेळीच उपाययोजना केली नाही तर हा भस्मासुर युवा पिढीस भस्मसात करेल.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या जागतिक समस्येमुळे अनेक तरुणांनी रोजगार गमावले आहेत. अशा परिस्थितीत स्वयंरोजगार हा देखील उत्तम पर्याय आहे, या दृष्टीने काम करित आहे आणि व्यापक स्तरावर करण्याचा मानस आहे.
छायाचित्र दालन
काही निवडक क्षणचित्रे
'शिवसेना पक्षप्रवेश'
संस्मरणीय क्षण
शिवसेनेच्या महाराष्ट्र हिताच्या, मुंबईच्या शाश्वत प्रगतीच्या अध्यायात सामिल व्हा!
शिवसेना
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारांवर चालणारा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर पूढे जाणारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुच करणारा अविरत भगवा झंझावात!