सत्ता साध्य नव्हे तर साधन!
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या पाठीशी प्रत्येक आपत्तीत, संकटात ठामपणे उभे
- चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यामुळे पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या भावेश परमार यांची मायदेशी वापसी करण्यासाठी यशस्वी सर्वतोपरी प्रयत्न
- लोहिया नगर, मरोळ पाईपलाइन, इंदिरा नगर – 2 येथील रहिवाशांची घरे नाला विस्तार प्रकल्पामुळे धोक्यात होती, ही घरे वाचविण्यात यश
- श्रद्धानंद रोड येथे नाला विस्तार प्रकल्पामुळे घरे धोक्यात होती, ही घरे वाचविण्यात यश
- मिलन सबवे येथील दोन इमारतींमधील प्रकल्पबाधित 200 कुटुंबांना एमएमआरडीए च्या संयुक्त विद्यमाने पर्यायी घरे मोफत देण्यात यश
- इंटरनॅशनल फ्लायओव्हरमुळे बाधित 1200 कुटुंबांना विद्याविहार, कुर्ला येथे मोफत घरे देण्यात यश
- प्रेमनगर एस आर ए - झोपडीधारकांच्या पाठीशी ठाम उभे
- शेअर रिक्षा सुविधा सुरुवात
- गुजरात भूकंप पीडीतांसाठी विलेपार्ले (पूर्व) येथे मोहिम तसेच बिहार पूरग्रस्तांसाठी रु. ११ लाखांचे मदत साहित्य जमा
- एस आर ए प्रकल्प बाधीतांच्या समस्या निराकरण
- गावठाण वाडी एफ एस आय आणि विमानतळांमुले बाधित जनतेपुढे पुनर्स्थापन इ समस्यात विशेष लक्ष
- वाहतुक समस्या, पाणी तुटवडा समस्या निवारणासाठी यशस्वी प्रयत्न सुधारणा प्रकल्पात हातभार
- सीकेपी बॅंक खातेधारकांच्या पाठीशी उभे
- दयनीय परिस्थितीत काम करणार्या पोस्टमॅन सोबत उभे
- कॅम्पा कोला इमारतीतील रहिवाशांच्या पाठीशी उभे
- विमानतळासमोरिल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुसरीकडे हलविण्यास विरोध
- सुपर मार्केटमधील गैरप्रकारांवर आक्षेप
- जीव्हीके कंपनीच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ टॅक्सीचालकांचा संप
- विमानतळ परिसरातील पाडकामास विरोध
- टॅक्सींना टोल मुक्त करण्याची मागणी
- ग्रॅन्ड हयात येथील कामगारांचा रोजगार वाचविण्यासाठी प्रयत्न
- गांजा विक्री करणारे नेटवर्क / ड्रग्स रॅकेट उध्वस्त
- रेल्वे दरवाढीविरोधात आक्रमक
- कोलडोंगरीमधील बस डेपोच्या जागेवरील अवैध कब्जाविरोधात आक्रमक
- रिलायन्सच्या वीज दरवाढीविरोधात आक्रमक
- 'ना फेरीवाला झोन' साठी प्रयत्न